Rain alert in Maharashtra : ऐन उन्हाळ्यात राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ABP Majha

ऐन उन्हाळ्यात राज्यावर आस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे... कारण विदर्भ, मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे... २१ आणि २२ एप्रिल रोजी हा पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, पालघर, ठाणे या भागात मात्र कोरडं हवामान राहील असा अंदाज आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, आंबा, काजू, भाज्या या पिकांना पावसाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होतेय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola