Raigad : खासदार संभाजीराजेंच्या पत्रानंतर कारवाई, मजार मोर्चाजवळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक
Raigad : रायगडावरील मजार मोर्चा परिसरात अज्ञातांकडून रंगरंगोटी करण्यात आली होती. यासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुरातत्त्व विभागाला पत्र लिहिलं होतं. याची दखल घेत पुरातत्व खात्याने मजार मोर्चा परिसरातील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत केलंय.