Pimpri-Chinchwad : प्लास्टिक बॉटलच्या बदल्यात चहा-वडापावचा नाश्ता फुकट ABP Majha
लॅस्टिक मुक्त शहर करण्याचं उद्धिष्ट पिंपरी चिंचवड महापालिकेने बाळगलं आहे. याचाच एक भाग म्हणून "प्लॅस्टिक बॉटल द्या, चहा-वडापाव खा" हा उपक्रम राबविण्याची तयारी सुरू केलीये. विक्रेत्यांना चहा आणि वडापावची रक्कम महापालिका अदा करणार आहे. त्यामुळे एका अर्थाने ग्राहकांना चहा आणि वडापाव अगदी मोफत मिळणार आहे. या उपक्रमात सहभागी होणारे विक्रेते आणि ग्राहक आपोआपच प्लॅस्टिक मुक्तीला हातभार देखील लावणार आहेत. यासाठी महापालिकेने वृत्तपत्रात एक जाहिरात प्रकट केली असून, चहा आणि वडापाव विक्रेत्यांना या अभिनव उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केलंय.