Rahul Shewale On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे भेटत नाहीत, राहुल शेवाळेंचे दिल्लीत गौप्यस्फोट

Rahul Shewale : भावना गवळी याच पक्षाच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद असून  त्यांचा व्हिप हा सर्व 18 खासदारांना लागू असल्याचं मुख्यमंत्री शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. आम्ही एनडीएचा घटक असून उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांनाच पाठिंबा देत आहोत असंही ते म्हणाले.  उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवसेना- भाजप युतीबाबत एक तास चर्चा झाली होती असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. मलाही युती करायची होती असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. युतीबाबत उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाल्याचं ते म्हणाले. भाजपशी युती करण्याविषयी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनीच आपल्याला युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायला सांगितलं होतं. त्यानंतर युतीमध्ये संजय राऊतांनी खोडा घातला असा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola