Rahul Shewale fill Nomination : माझ्या विरोधकांना शुभेच्छा! जनतेचा कौल 4 जूनला सगळ्यांना कळेल
Rahul Shewale fill Nomination : माझ्या विरोधकांना शुभेच्छा! जनतेचा कौल 4 जूनला सगळ्यांना कळेल. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी ते सर्व देवतांचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. खासदारकीची हॅटट्रिक मारणार असल्याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही भुमिका घेतली तो काळ कठीण होता अस त्यांच्या पत्नी कामीनी शेवाळे यांनी म्हटलं आहे. तर माझं पहिल मतदान असुन माझ्या बाबांच्या विकासकामाला पाहून मी त्यांना मतदान करणार असल्याचं त्यांचे चिरंजीव स्वयंम शेवाळे यांनी म्हटलं आहे.