Rahul Narvekar : निवडणूक किती टप्प्यात घ्यायची हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाचा

Continues below advertisement

Rahul Narvekar : निवडणूक किती टप्प्यात घ्यायची हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाचा 

राज्यातील विधानसभा निवडणुकीची मंगळवारी निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे  (Vidhansabha Election 2024) वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील निवडणूक किती टप्प्यात होणार, याविषयी सर्वांना उत्सुकता आहे. येत्या 26 नोव्हेंबरला विधानसभा विसर्जित होणार आहे. त्यापूर्वी मतदान आणि निकालाची प्रक्रिया पार पडून नवीन सरकार अस्तित्त्वात येणे गरजेचे आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. या निवडणुकीत भाजप 105 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एकसंध शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि 44 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram