Rahul Gandhi Vote Scam : हरियाणात 'सरकार चोरी', राहुल गांधींचा भाजप-निवडणूक आयोगावर थेट आरोप

Continues below advertisement
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Elections) मोठ्या प्रमाणात 'मतदार चोरी' (Vote Theft) झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजप (BJP) आणि निवडणूक आयोगाने (Election Commission) मिळून हे 'ऑपरेशन सरकार चोरी' (Operation Sarkar Chori) राबवल्याचा दावा त्यांनी केला. 'हरियाणातील सरकार हे चोरीचं सरकार आहे आणि मुख्यमंत्री चोरीचे मुख्यमंत्री आहेत', असा थेट हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. हरियाणाच्या मतदार यादीत २५ लाखांपेक्षा जास्त बनावट मतदार असल्याचं गांधी म्हणाले. यामध्ये एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो तब्बल २२ वेळा वापरण्यात आला, तर एकाच व्यक्तीचा फोटो २२३ वेळा वापरून मतदान केल्याचे पुरावे त्यांनी सादर केले. उत्तर प्रदेशातील भाजप कार्यकर्ते हरियाणातही मतदान करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा लोकशाही आणि आंबेडकरांच्या संविधानावरील हल्ला असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या निःपक्षपातीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola