Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा काल मुंबईत समारोप
Continues below advertisement
Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा काल मुंबईत समारोप
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा काल मुंबईत समारोप झाला. मुंबईत चैत्यभूमीवर राहुल गांधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत भारत जोडो न्याय यात्रेची सांगता केली. मणिपूर ते मुंबई ६ हजार ६०० किलोमीटरचं अंतर राहुल गांधींनी पार केलं. तब्बल १५ राज्यातून यात्रेचा प्रवास झाला. ६६ दिवस ही यात्रा सुरू होती. काल ठाण्यातून चौकसभेने राहुल गांधींनी सुरूवात करत मुंबईत प्रवेश केला. मुंबईत राहुल गांधी यांच्या यात्रेत प्रियांका गांधी वाड्राही सहभागी झाल्या. मुंबईत राहुल गांधी यांच्या यात्रेला भव्य प्रतिसाद मिळाला.
Continues below advertisement