Vote Scam : ‘मतचोर सरकारची ही जमीन चोरी’, राहुल गांधींचा थेट मोदींवर निशाणा

Continues below advertisement
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या पुणे येथील जमीन व्यवहारावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'मतचोरी करून सत्तेत आलेल्या सरकारची ही जमीन चोरी आहे', अशा शब्दात राहुल गांधी यांनी 'X' वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पुण्यातील दलित राखीव असलेली सरकारी जमीन कवडीमोल भावाने विकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दुसरीकडे, आगामी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) पार्थ पवार जमीन प्रकरणासोबतच डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचे (Dr Sampada Munde suicide case) पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांवरून विरोधक केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती आखत आहेत. दरम्यान, नाशिकच्या वडाळा रोडवरील अशोका हॉस्पिटल परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटनाही समोर आली आहे, ज्यात एक जण गंभीर जखमी झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola