Pune Fraud Case: 'माझ्या'च्या बातमीचा इम्पॅक्ट, 'मांत्रिक' Deepak Khadke सह तिघांना Nashik मधून अटक

Continues below advertisement
पुण्यातील डोळस कुटुंबियांची 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. यामध्ये मांत्रिक दीपक खडके, वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांचा समावेश असून, त्यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'या प्रकरणात अंदाजे चौदा कोटी रुपयांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि नाशिकवरून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे'. आपल्या दोन मुलींच्या आजारपणावर उपचार करण्याच्या बहाण्याने मांत्रिकाच्या नादी लागलेल्या आयटी इंजिनिअर दीपक डोळस यांची ही फसवणूक झाली. आरोपींनी त्यांच्या अंगात शंकर महाराज संचारत असल्याचा बनाव करून डोळस कुटुंबियांकडून पैसे उकळले, इतकेच नाही तर त्यांना इंग्लंडमधील घर विकायला लावले. या पैशातून आरोपींनी पुण्यात आलिशान बंगला खरेदी केल्याचेही समोर आले आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा (EOW) करत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola