Rahul Gandhi : हरियाणा मतदार यादीत घोटाळा? एकाच महिलेचे २२३ मतदार ओळखपत्र!
Continues below advertisement
हरियाणातील (Haryana) मतदार यादीत (Voter List) मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. 'ती महिला तिला पाहिजे तितक्या वेळा मतदान करू शकते', असा थेट दावा राहुल गांधी यांनी केला आहे. एकाच महिलेचा फोटो दोन पोलिंग बूथमध्ये २२३ वेळा वापरण्यात आल्याचे त्यांनी पुराव्यासह म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. निवडणूक आयोग (Election Commission) जाणीवपूर्वक पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) नष्ट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हरियाणात अशा प्रकारची हजारो उदाहरणे असून ममता, दुर्गा, संगीता यांसारख्या नावांपुढे अस्पष्ट फोटो (Blurred Photos) वापरून कोणीही बोगस मतदान (Bogus Voting) करू शकत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. हा प्रकार केवळ बूथ स्तरावर नसून व्यापक स्तरावर चालू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement