Pune Crime: 'अंगात शंकर महाराज येतात', सांगून IT Engineer ला 14 कोटींना गंडवणारी मांत्रिक फरार

Continues below advertisement
पुण्यातील आयटी इंजिनियर (IT Engineer) दीपक डोळस (Deepak Dolas) यांची तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेदिका पंढरपूरकर (Vedika Pandharpurkar) नावाच्या एका मांत्रिक महिलेने ही फसवणूक केली आहे. ‘आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात आणि ते तुमच्या दोन मुलींना असलेले दुर्धर आजार बरे करतील’, असं सांगून वेदिका पंढरपूरकर यांनी डोळस यांचा विश्वास संपादन केला. या अंधश्रद्धेला बळी पडून डोळस यांनी पुण्यातीलच नाही, तर इंग्लंडमधील मालमत्ता विकून पैसे दिले. मात्र, आता त्यांच्या मुलींच्या उपचारासाठीही पैसे उरले नाहीत. या पैशातून वेदिका आणि तिचा पती कुणाल पंढरपूरकर यांनी कोथरूडमधील महात्मा सोसायटीत 'कैलासदीप' नावाचा आलिशान बंगला खरेदी केला आहे. घटनेनंतर, वेदिका आणि तिचा पती बंगल्यातून फरार झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola