Padma Award : पद्म पुरस्कार स्वीकारताना काळ्या मातीची आठवण झाली, बीजमाता राहीबाई पोपेरे ABP'माझा'वर

Continues below advertisement

पद्म पुरस्कार स्वीकारताना आपल्याला काळ्या मातीची, शेतकऱ्यांची आठवण झाली, असं कृतज्ञतापूर्ण मनोगत बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी आज व्यक्त केलं. पद्म पुरस्कार स्वीकारल्यानंतर राहीबाईंनी एबीपी माझाशी संवाद साधताना दिल्लीतील या कार्यक्रमाचा अनुभव मनमोकळेपणाने मांडला. अनवाणी पायाने आपण पुरस्कार स्वीकारल्याने राष्ट्रपतींनी आपल्याकडे विचारणा केली, तसंच तुमचं काम पुढच्या पिढीसाठी गरजेचं असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. भारतात देशी बियाण्यांची बँक देशात सुरु करावी, अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली असून त्यांनाही बियाण्याच्या बँकेला भेट देण्यासाठी आपण आमंत्रण दिलंय, असंही राहीबाईंनी यावेळी सांगितलं. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram