Uddhav Thackeray Pc : राधाकृष्ण विखे पाटलांना कितीवेळा थकबाकी, कर्जमुक्ती केलीय, हिशोब मांडावा
Continues below advertisement
महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीवरून राजकीय वातावरण तापले असतानाच, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे. 'सोसायटी काढायची, पुन्हा कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, हे अनेक वर्ष काम चालू आहे,' असे विधान राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले आहे. या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त पाळण्यावर भर देताना अशाच प्रकारची टिप्पणी केली होती. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, सरकारच्या या घोषणेनंतरही मंत्र्यांकडून येणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement