Uddhav Thackeray : 'तुम्हाला फुकटात जमीन कशी मिळाली?', Ajit Pawar यांना थेट सवाल

Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'तुम्ही हात पाय न हलवता जमीन मिळाली ना तुम्हाला? काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकटात?', असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला आहे. मराठवाड्यात शंभर वर्षांतील सर्वात भीषण आपत्ती आली असून, शेतकऱ्यांची घरंदारं, गुरंढोरं आणि आयुष्य वाहून गेलं आहे, त्यामुळे सरकारने तात्काळ कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना, 'कोणतंही बटण दाबा, मत आम्हालाच मिळेल' असं भाजपवाले सांगतात, असा टोला त्यांनी लगावला. पंचनामे करून नुकसान भरपाई न दिल्यास तहसीलदार कार्यालयाला घेराव घालण्याचा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola