Pushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
Pushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
मुंबई : मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला (Pushpak Express Train Accident) आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. पण समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने (Karnataka Express) त्यांना चिरडल्याची घटना घडली. हा दुर्दैवी अपघात जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ (Jalgaon Pardhade) झाल्याची माहिती आहे. या अपघातात आठ ते नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच 40 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आलं असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने (Pushpak Express) अचानक ब्रेक लावल्याने त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे काही प्रवाशांनी ही आग लागल्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे भयभीत झालेल्या त्या प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. पण समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडल्याची माहिती आहे.
Jalgaon Train Accident : प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
बाबा जाधव हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांनी सांगितलं की, परधाडे स्टेशनच्या आधी ट्रेनचा ब्रेक लागल्याने घर्षण झालं आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी प्रवाशांनी उड्या मारायला सुरूवात केली. त्यामध्ये अनेकजण कर्नाटक एक्स्प्रेसच्या खाली आले.