Pushpa Ganedivala: न्यायमुर्ती पुष्पा गनेडिवाला यांचा राजीनामा, 'स्कीन टू स्कीन टच' निकालाने चर्चेत
Continues below advertisement
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयानं त्यांना वर्षभरासाठी दिलेली मुदतवाढ 12 फेब्रुवारी रोजी संपत होती. त्यामुळे गनेडीवाला यांनी त्यापूर्वीच आपला राजीनामा सादर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं 'स्कीन टू स्कीन' बाबत दिलेल्या विवादीत निकालावर सर्व स्तरातून तीव्र पडसाद उमटले होते. सर्वोच्च न्यायालयानं या निकालाला स्थगिती दिल्यानंतर अवघ्या काही तासांत न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी त्याच आशयाचा दिलेला आणखीन एक निकाल समोर आला होता. त्यामुळे अखेरीस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदालाही न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची दखल घ्यावी लागली होती.
Continues below advertisement
Tags :
Mumbai High Court Justice Pushpa Ganediwala Resigns Union Ministry Of Law And Justice 'Skin To Skin' Severe Repercussions