Rummy Controversy | कृषिमंत्र्यांच्या Rummy खेळावरून राजीनाम्याची मागणी, विरोधक आक्रमक!
कोकाटे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला असला तरी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी बेजबाबदार वक्तव्य केले. माणिकराव कोकाटे यांनी दाखवलेली असंवेदनशीलता, केवळ Rummy खेळाबद्दलच नव्हे तर शेतकऱ्यांबद्दल वापरलेल्या भाषेमुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी विरोधकांची मागणी आहे. कोकाटे यांनी कहर केला असून, शेती खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे आणि त्यात मन रमत नाही म्हणून विधिमंडळात Rummy खेळत बसतात, असे विरोधकांचे म्हणणे आहे. 'कोणत्याही परिस्थितीत कृषिमंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल,' अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. या प्रकरणी राजकीय वातावरण तापले असून, कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या असंवेदनशील वक्तव्यांमुळे आणि सभागृहातील वर्तनामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.