Pune : भरतीसाठी प्राध्यापकांचा शिक्षक दिनी एल्गार, तोंडाला काळं फासून आंदोलन
प्राध्यापक भरती लवकरात लवकर करावी यासाठी आज शिक्षक दिनाच्या दिवशीच पुण्यात प्राध्यापकांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी शिक्षकांनी आपल्या तोंडाला काळं फासून आंदोलन सुरु केलं असून राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.