ShivJayanti 2020 | शिवनेरी गडाच्या विकासासाठी 23 कोटी रुपयांचा निधी देणार : अजित पवार |

जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गड दुमदुमुन गेलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी शिवनेरीवर दाखल होत शिवरायांना वंदन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी शिवनेरी गडाच्या विकासासाठी 23 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. स्वराज्याची राजधानी राहिलेल्या शिवनेरी गडावर शिवजयंतीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडतो. राज्यभरातून लाखो शिवभक्त शिवनेरीवर दाखल होत शिवरायांना अभिवादन करतात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola