Pune Shaniwar Wada : शनिवारवाड्यात नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल, पतित पावन संघटनेचं आंदोलन

Continues below advertisement
पुण्यातील शनिवारवाड्यामध्ये (Shaniwar Wada) नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर खासदार मेधा कुलकर्णी (MP Medha Kulkarni) आणि पतितपावन संघटनेने (Patit Pavan Sanghatana) तीव्र आंदोलन केले. 'असले दर्गे, थोटांडे हे! आम्ही असली थोटांडं तण करणार नाही', असे म्हणत खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रशासनाला आठवड्याभरात मजार हटवण्याचा इशारा दिला आहे. रविवारी झालेल्या या आंदोलनादरम्यान, कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आले होते, ती जागा गोमूत्र शिंपडून शुद्ध केली आणि शिववंदना म्हटली. आंदोलक इतके आक्रमक झाले होते की त्यांनी शनिवारवाड्याबाहेर असलेल्या मजारीवर भगवा झेंडा लावण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola