Serial Viral Aaji: 'सिरियलमधली जाहिराती कमी करा, सुप्रियाताईंकडे गाऱ्हाणं मांडणाऱ्या आजी Exclusive
Continues below advertisement
पुण्यात एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या घोडके आजींची एबीपी माझाने खास मुलाखत घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे टीव्ही सिरियलमधील जाहिरातींची तक्रार करून या आजी प्रसिद्ध झाल्या होत्या. 'सिरियलमध्ये विष घालणं किंवा इतर नकारात्मक गोष्टी दाखवू नका, कारण त्याचा मुलींच्या मनावर वाईट परिणाम होतो,' अशी नवी मागणी आता त्यांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या राजकीय मतांवरही भाष्य केलं. 'राज ठाकरे यांच्या आवाजात दम आहे, पण त्यांना कोणी पाठिंबा दिला नाही,' असं मत त्यांनी व्यक्त केलं. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळातील राजकारण अधिक चांगले होते आणि आता भ्रष्टाचार वाढला आहे, असेही त्या म्हणाल्या. गेल्या साठ वर्षांपासून त्याच घरात एकट्या राहणाऱ्या या आजींनी त्यांचे आवडते अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री रंजना असल्याचंही सांगितलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement