Lalu Prasad Land for Jobs Scam: नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा, लालू प्रसाद यादव यांच्यावआरोप निश्चित

Continues below advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी (Land for Jobs Scam) दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) आणि मुलगा तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. ‘नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याच्या’ आरोपांवरून कोर्टाने ही कारवाई केली आहे. लालूप्रसाद यादव २००४ ते २००९ या काळात रेल्वेमंत्री असताना रेल्वेमध्ये ‘ड’ वर्गात नोकरी देण्याच्या बदल्यात उमेदवारांकडून किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून जमिनी घेतल्याचा आरोप आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना झालेली ही कारवाई RJD साठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola