8th Pay Commission : केंद्राचा मोठा निर्णय, आठव्या वेतन आयोगाला हिरवा कंदील
Continues below advertisement
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) स्थापनेला आणि त्याच्या कार्यकक्षांना (Terms of Reference) मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी या निर्णयाची घोषणा केली. वैष्णव यांनी सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या वेतन आयोगाची रचना, टर्म्स ऑफ रेफरन्स आणि कालमर्यादा या बाबींना मंजुरी दिली आहे, हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे'. या निर्णयामुळे सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. हा आयोग अठरा महिन्यांत आपला अहवाल सरकारला सादर करणार असून, शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. या घोषणेमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण यामुळे त्यांच्या मूळ वेतनात आणि भत्त्यांमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. या निर्णयाकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement