Human-Leopard Conflict: बिबट्याच्या दहशतीमुळे Pune च्या महिला गळ्यात घालतायत खिळ्यांचे पट्टे!

Continues below advertisement
उत्तर पुणे परिसरात, विशेषतः शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जीव वाचवण्यासाठी येथील महिलांनी एक धोकादायक उपाय शोधला असून, त्या मानेवर होणारे हल्ले टाळण्यासाठी गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घालत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी ग्रामस्थांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याने, 'वनविभाग नेमकं काय करतंय?', असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. अलीकडच्या काळात या भागात बिबट्याच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा, ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे, दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण असून, ते प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची मागणी करत आहेत. वनविभागाने प्रतिसाद म्हणून काही ठिकाणी पिंजरे आणि AI-आधारित अलर्ट सिस्टीम बसवली असली तरी, ग्रामस्थांच्या मते हे प्रयत्न अपुरे आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola