Rohit Pawar On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्रात जमीन घोटाळे झालेत
Continues below advertisement
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर ड्रोन घिरट्या घालत असल्याने खळबळ उडाली, मात्र नंतर एमएमआरडीए (MMRDA) कडून पॉड टॅक्सीसाठी (Pod Taxi) सर्वेक्षण सुरू असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावरून आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो, पदाचा गैरवापर करणाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे', असे रोहित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सत्तेत आल्यापासून राज्यात जमीन घोटाळे सुरू झाले आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. इतकेच नाही तर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर भाजप (BJP) एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) लक्ष्य करेल, असा दावाही रोहित पवारांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement