Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्याची दैना, वाहतूक कोंडी, महिला असुरक्षित, तरुणींना काय वाटतं?

Continues below advertisement
पुण्यातील (Pune) तरुणी वाहतूक कोंडी, महिलांची असुरक्षितता (Women Safety) आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे त्रस्त झाल्या आहेत. प्रशासक राजवटीत (Administrator Rule) महापालिकेच्या (PMC) कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एका तरुणीने संतप्त सवाल केला की, ‘मी लहानपणीपासून राहतेय पुण्यामध्ये पण मला सेफ वाटतं पण कधी कधी जसं आपण न्यूज पाहतो की कोयता गँग (Koyta Gang) असेल किंवा मुलींसोबत जसं आता इकडे स्वारगेटला (Swargate) त्या मुलींसोबत रेप केस (Rape Case) झाली तर मला पण असं फील होतं की अरे माझ्यासोबत झालं तर... म्हणजे जी इन्सेक्युरिटी येते’. शहरात २०१७ नंतर निवडणूक झालेली नाही आणि २०२२ पासून प्रशासक राजवट आहे. तरुणींनी खराब रस्ते, केरकचरा, सार्वजनिक शौचालयांची (Public Toilets) दुरवस्था, पादचारी मार्गावरील (Footpath) अतिक्रमण आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका (Libraries) नसल्याच्या समस्या मांडल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola