Mission Mumbai: 'जास्त जागा लढवणार', मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप-RSS ची खलबतं

Continues below advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पदाधिकारीही सहभागी झाले होते. या बैठकीत 'अधिक जागा भाजप यंदा लढवणार' असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. महायुतीसोबत निवडणूक लढवतानाही अधिक जागा मिळवण्यावर भाजपचा भर असून, उमेदवार निश्चिती आणि निवडणुकीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. एकीकडे पक्षात इनकमिंग सुरू असताना, दुसरीकडे जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola