Pune Rave Party | ससूनचा अहवाल समोर, खेवलकर, श्रीपाद यादव यांनी केलं होतं मद्यप्राशन?
Continues below advertisement
पुण्यातील खराडी येथील ड्रग्स पार्टी प्रकरणात ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. अटकेत असलेल्या प्रांजल केवलकर आणि श्रीपाद यादव या दोघांनी मद्यपान केले होते, असे या अहवालात नमूद आहे. मात्र, अमली पदार्थांचे सेवन झाले होते का, याबाबतचा अहवाल अद्याप आलेला नाही. या संदर्भात न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे रक्ताचे नमुने पाठवण्यात आले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत हे अहवाल येणे अपेक्षित आहे. खाजगी जागेत मद्यपान करणे हा गुन्हा ठरत नाही. पुणे पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने दोनच दिवसांची कोठडी दिली. न्यायालयाने या प्रकरणाला 'रेव पार्टी' म्हणावे का, यावर साशंकता व्यक्त केली आहे. 'रेव पार्टी' ही एक वेगळी संकल्पना असून, ही खाजगी जागेत सुरू असलेली पार्टी होती, असे बचाव पक्षाकडून मांडण्यात आले. अमली पदार्थ कोणाकडे सापडले आणि ते कुठून आले, हे पोलिसांना सिद्ध करावे लागणार आहे.
Continues below advertisement