Dilapidated School | बीडच्या वडवणीत जीवघेणी शाळा, विद्यार्थी भीतीच्या छायेत!
Continues below advertisement
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील हरिश्चंद्र पिंपरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत सध्या जीर्ण अवस्थेत आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवताना पालक चिंतेत आहेत. शाळेच्या दुरुस्तीसाठी पालक आणि शिक्षकांनी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. मात्र, शाळेची दुरावस्था अजूनही तशीच आहे. शाळेच्या दोन खोल्या पूर्णपणे जीर्ण झाल्या आहेत. यावर, "आम्हाला कमीत कमी दोन वर्ग ठेवायला शासनाने तत्काळ मंजूर करून बांधकाम सुरू द्यावं," अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement