Parbhani Accidnet: परभणीच्या पाथरीत उपजिल्हाधिकाऱ्यांचा वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
Continues below advertisement
पुणे पोर्शे अपघात प्रकरणात (Pune Porsche Crash) धक्कादायक वळण आले असून, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल (Vishal Agarwal) आणि आजोबा सुरेंद्र अगरवाल (Surendra Agarwal) यांच्यावर ड्रायव्हरच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. 'तोंड उघडलेस तर परिणाम लक्षात ठेव', अशी धमकी देऊन ड्रायव्हरला चुकीची साक्ष देण्यासाठी डांबून ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दुसरीकडे, अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने (Blood Sample) बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे (Sassoon Hospital) डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांनाही अटक करण्यात आली आहे. या कटात आरोपीच्या आई-वडिलांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement