Special Report Voter List : निवडणुकीत मॅच फिक्सिंग? राज ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) हल्लाबोल केला आहे. मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीत (Voter List) तब्बल 96 लाख खोटे मतदार असल्याचा गंभीर आरोप केला. 'तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ. मॅच फिक्सिंग झालेलं आहे', अशा शब्दात राज ठाकरे यांनी निवडणुका पूर्वनियोजित असल्याचा दावा केला आहे. जोपर्यंत मतदार याद्या पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत आणि सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नयेत, असे आव्हान त्यांनी निवडणूक आयोगाला दिले. आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी भाजप आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यासारख्या सत्ताधारी आमदारांचे व्हिडिओ दाखवले, ज्यांनी मतदार याद्यांमधील त्रुटींवर बोट ठेवले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनीही राज ठाकरेंच्या 'मॅच फिक्सिंग'च्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola