Pune Car Accident Case : पुणे अपघात प्रकरणात लाचलुचपत विभागाची एन्ट्री, रडारवर कोण?
पुणे : पुण्यात दारुड्या पोरानं दोघांचे (Pune Accident News) बळी घेतल्याच्या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतोय. सोशल मिडीयावर पोलिसांवर यथेच्छ टीका होतेय. या प्रकरणात विधी संघर्ष मुलाचा ब्लड रिपोर्ट (Blood Report) सध्या मोठ्या कुतूहलाचा विषय ठरला. त्यात ब्लड रिपोर्ट बदलल्याने नेमके कोणाचे ब्लड सॅम्पल दाखवले हा प्रश्न अनुत्तरीत होता. अखेर ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलाचे बदललेले ब्लड सॅम्पल हे एका महिलेचे असल्याचं चौकशी समितीच्या अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र हे सॅम्पल मुलाच्या आईचे असल्याची चर्चा रंगली आहे.
कल्याणीनगर अपघातानंतर 19 मे रोजी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, पोलिसांना नमुने देताना ससूनमधील डॉक्टरांनी दुसरेच रक्ताचे नमुने दिले होते. त्यामुळे त्या रक्तचाचणीत कोणताही दोष आढळून आला नव्हता. मात्र, अनेक दिवस जे रक्त पोलिसांना देण्यात आले होते ते कुणाचे होते, हा प्रश्न अनुत्तरित होता. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने बुधवारी अहवाल सादर केला. त्यात मुलाचे रक्ताचे नमुने हे एका महिलेचे असल्याचे समोर आली आहे.