Pune Political War: 'BJP मध्ये जमलेली सगळी विकृतीचे लोक', रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर घणाघात

Continues below advertisement
पुण्यातील जैन बोल्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'मी भारतीय जनता पार्टीवर अजिबात बोलत नाही आणि ही जी भारतीय जनता पार्टीमध्ये जमलेली ही सगळ्याच विकृतीचे लोक आहेत,' असा घणाघाती हल्लाबोल रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. धंगेकर यांनी 'X' वर पोस्ट करत, मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर अॅट्रोसिटीसारखा गुन्हा दाखल असल्याची माहिती लपवल्याचा दावा केला. मोहोळ यांनी त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले होते, यावर धंगेकरांनी प्रतिज्ञापत्राचे पुरावे सादर करत मोहोळांवर खोटे बोलल्याचा आरोप केला आहे. तसेच, जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली आणखी दोन प्रकरणं लवकरच समोर आणणार असल्याचा इशाराही धंगेकरांनी दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola