Phaltan Doctor Case : मृत महिला डॉक्टरवर बीड जिल्ह्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार

Continues below advertisement
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गंभीर आरोप आहेत. पीडित डॉक्टरने आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, ‘पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदनेने चार वेळा बलात्कार केला’. या धक्कादायक खुलाशामुळे पोलीस आणि आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाईचे आदेश दिले असून, आरोपी PSI गोपाल बदनेला निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणात केवळ दोनच आरोपी नसून, एका खासदाराकडूनही दबाव आणल्याचा आणि त्रास दिल्याचा आरोप पीडितेने यापूर्वीच्या तक्रारीत केला होता, ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola