Pune Nilesh Ghaywal च्या मुलाच्या शिक्षणाचा पैसा कुणाचा? पोलीस थेट परदेशी विद्यापीठाला पत्र लिहिणार

Continues below advertisement
कोथरूड गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. पोलिसांनी घायवळच्या मुलाच्या परदेशी शिक्षणाच्या फीचा स्रोत तपासण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी परदेशी विद्यापीठाशी थेट पत्रव्यवहार केला जाणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घायवळच्या दहा बेकायदेशीर सदनिका सील करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीच घायवळची अनेक बँक खाती आणि लाखो रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. आता त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कोणत्या खात्यातून आणि कसे गेले, याचा तपास पोलीस करत आहेत. या चौकशीतून घायवळचे भारताबाहेरील आर्थिक व्यवहार आणि इतर कनेक्शन उघडकीस आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे, ज्यामुळे त्याची आर्थिक कोंडी केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola