Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला वादात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, यावेळी निमित्त आहे ते त्यांच्या 'अमेडिया' कंपनी आणि 'जिजाई' बंगल्याचं. पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा नोंदणीकृत पत्ता हा अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या 'जिजाई' बंगल्याचा देण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की, 'पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीचे कार्यालय निवासी बंगल्यात सुरू केले असल्यास, त्यांनी महापालिकेला मिळकत कर व्यावसायिक दराने भरला आहे का?' या प्रकरणाची आता चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा बंगला मूळ बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा असून अजित पवार तिथे भाडेतत्त्वावर राहतात. विशेष म्हणजे, यापूर्वी आदर्श घोटाळ्यातही याच बंगल्याचा पत्ता वापरण्यात आल्याने 'जिजाई' बंगला पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement