Pune Namaz Row: 'खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा', अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरेंची मागणी

Continues below advertisement
पुण्यातील शनिवारवाड्यात (Shaniwar Wada) काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याच्या व्हिडिओनंतर मोठे राजकीय वादळ उठले आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी या जागेचे 'शुद्धीकरण' करत आंदोलन केले, ज्यावर महायुतीमधील अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) आणि शिवसेनेचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 'मी भाजपला सांगते की या खासदारांना तुम्ही आवरा आणि हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मेधा कुलकर्णी ताईंवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत,' अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात पुरातन वास्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर, खासदार कुलकर्णी यांच्या कृतीमुळे सामाजिक शांतता भंग होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरोधातही कारवाईची मागणी केली आहे, ज्यामुळे महायुतीमध्येच मतभेद उघड झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola