
Pune Mumbai Expressway: पुणे - मुंबई दृतगती महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला
Continues below advertisement
Pune Mumbai Expressway: पुणे - मुंबई दृतगती महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला पुणे मुंबई द्रुतगती मार्ग आज ही मंदावला आहे. सलगच्या सुट्ट्या असल्यानं मुंबईकर मोठ्या संख्येनं बाहेर पडलेत. परिणामी द्रुतगती मार्गावर याचा ताण आलाय. वाहनांच्या वाढलेल्या संख्येनं बोरघाटात मार्ग मंदावला आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहनं कासवगतीने पुढं सरकत आहेत. कोणाला पर्यटनस्थळी तर कोणाला आपापल्या गावाला पोहचायचं आहे, पण तत्पूर्वी या वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आलीये, परिणामी अधिकचा वेळ खर्ची घालावा लागतोय.
Continues below advertisement