Pune : राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीला सुरुवात Maratha Reservation
आज मागास आयोगाची बैठक - राज्य मागासवर्ग आयोगाची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी निकष आणि प्रश्नावली तयार करण्यासाठी ही बैठक आहे –राज्य मागासवर्ग आयोगाच्या महत्त्वाच्या बैठकीचे पुण्यात गुरुवारी आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी निकष आणि प्रश्नावली निश्चित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठ समाजाच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी विविध उपसमित्या नेमुण या समित्यांना कामकाजाचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी किती निधी लागेल हे ठरवून राज्य सरकारकडे या निधीसाठी मागणी राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येणार आहे. मात्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून उचलण्यात येणारी ही पावले एनवेळेस उचलली जात असल्याच म्हटलय जातय. कारण 2021 मधे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर मागील दोन वर्षांत राज्य सरकारकडून मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाच सर्वेक्षण करण्याठी न कोणता निधी देण्यात आला न कोणती यंत्रणा पुरवण्यात आली. मनोज जरांगे पाटलांच्या रुपाने मराठा आंदोलनाने जोर पकडल्यानंतर राज्य सरकारकडून आता मागासवर्ग आयोगाला हे सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आलय. मात्र आयोगाच्या सदसयांच्या मते या सर्वेक्षणाला किमान सहा महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागू शकतो