Pune Madhvi Kumbhar Bike Stunt : वर्षभराआधीच पोलिसांनी दिला होता समज,पण माधवीने पुन्हा केला स्टंट!
Pune Madhvi Kumbhar Bike Stunt : वर्षभराआधीच पोलिसांनी दिला होता समज,पण माधवीने पुन्हा केला स्टंट!
Pune Madhvi Kumbhar Bike Stunt : वर्षभराआधीच पोलिसांनी दिला होता समज,पण माधवीने पुन्हा केला स्टंट!पुण्यातील फुरसुंगीतील तरुणीची पुन्हा एकदा स्टंटबाजी वर्षभरापूर्वी याच स्टंटबाजीमुळे पोलिसांनी समज दिली होती पुण्यातील इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असलेली माधवी कुंभार तिने पुन्हा एकदा बुलेटवर स्टंटबाजी करण्याचा रील इंस्टाग्राम वर पोस्ट केले. रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. अतिशय साहसी पद्धतीने हा रील शूट केल्याचं दिसत आहे. बुलेटवर चक्क उभे राहून तिने ही स्टंटबाजी केली आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी असले स्टंट करत असल्याच दिसून येते. पुण्यातील माधवी कुंभार हिला एक वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे स्टंटबाजी केल्यामुळे पोलिसांनी बोलवून समज दिली होती मात्र त्यानंतरही माधवीने हा प्रकार सुरूच ठेवल्याचं दिसून येते. यावर आता पोलीस पुन्हा एकदा तिला बोलवणार का? तिला समज देणार का? की तिच्यावर कठोर कारवाई करणार? हे पहावं लागणार आहे.