Pune Lok Sabha Exit Poll वास्तव भाग 34 : Western Maharashtra मध्ये जनतेचा कौल कुणाला?

Continues below advertisement

Pune Lok Sabha Exit Poll वास्तव भाग 34 : Western Maharashtra मध्ये जनतेचा कौल कुणाला?

पुणे : महाराष्ट्रात लोकसभेचे 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा भाग समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) लोकसभेच्या 10 जागा आहेत. पश्चिम   महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पश्चिम महाराष्ट्रातील 10 विधानसभा मतदारसंघांपैकी 7 जागा मिळाल्या होत्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळाल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्रात बारामती, (Baramati Lok Sabha Seat) शिरुर,मावळ,सातारा,माढा, सोलापूर ,हातकणंगले,सांगली, कोल्हापूर, पुणे असे लोकसभेचे 10 मतदारसंघ आहेत. आता महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होत आहे. यावेळी कोण बाजी मारणार याचा अंदाज पुण्यातील पत्रकारांनी वर्तवला आहे. पुण्यातील पत्रकार पांडुरंग सांडभोर,  दिगंबर दराडे, शैलेश काळे आणि राजेंद्र पाटील यांनी अंदाज वर्तवला. 

पांडुरंग सांडभोर यांचा अंदाज काय?

पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता.  2014 आणि 2019 मध्ये या भागात भाजप आणि शिवसेनेनं यश मिळवलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला देखील काही जागा मिळाल्या होत्या. भाजपचे इथं 4, शिवसेनेचे 3 आणि राष्ट्रवादीचे 3 खासदार होते.   2024  ला भाजप विरोधात सुप्त लाट दिसली. लोकसभेची निवडणूक असली तरी स्थानिक मुद्ये महत्त्वाचे ठरले आहेत. पुणे मावळ वगळता ग्रामीण मतदारसंघ शेतीचे प्रश्न आहे. 2014 च्या विरोधातील स्थिती आहे. महाविकास आघाडीला 6 ते 7 आणि महायुतीला 3 ते 4 जागा मिळतील, असा अंदाज पांडुरंग सांडभोर यांनी वर्तवला. महायुतीला पुणे, सांगली, सोलापूर या जागांवर विजयाची संधी आहे, असं सांडभोर यांनी म्हटलं. तर, बारामतीची निवडणूक भावनिक झाली.  ही निवडणूक पूर्णपणे भावनिकतेवर गेलेली आहे. ही निवडणूक कांटे की टक्कर झालेली आहे. खडकवासला मतदारसंघाची भूमिका निर्णायक राहील, असं सांडभोर म्हणाले. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram