Kokan Election Poll : ठाणे-कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला फक्त १ जागा मिळणार:एक्झिट पोल लोकसभा निवडणुकीत कोकण आणि ठाणे पट्टयात महायुती आणि महाविकास आघाडीला संमीश्र कौल मिळत असल्याचा अंदाज प्रमुख मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आला आहे. कोकणच्या भूमीत कुणाचा झेंडा फडकणार हे आता आपण जाणून घेणार आहोत. एव्हाना तिथे पावसाची चाहूल लागलीय, मात्र वरुणराजाचं आगमन होण्याआधी मतदारराजाने मतांचा वर्षाव कुणावर केलाय, काय अंदाज आहे तिथल्या जागांचा याबद्दल जाणून घेण्यासाठी तिथल्या पत्रकारांची निरीक्षणं काय आहेत ते जाणूुन घेऊया. त्यापूर्वी एक्झिट पोलमध्ये काय आकडेवारी समोर आलीय ते पाहूया.देशाचा कौल भाजपला अनुकूल दिसत असताना महाराष्ट्रात मात्र महायुती आणि महा विकास आघाडीत जोरदार संघर्ष असल्याचे पहायला मिळत आहे. कोकण ठाणे पट्टयात भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव सेना, राष्ट्रवादीच्या शरद पवार पवार गटात थेट सामना होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे जिल्ह्यातील तिन्ही जागा महत्वाच्या होत्या. त्यापैकी ठाण्याच्या जागेवर शिंदे आणि उद्धव यांच्या शिवसेनेत जोरदार संघर्ष झाल्याचे चित्र असून टिव्ही ९ या वृत्तवाहिन्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येथून उद्धव सेनेचे राजन विचारे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कल्याणची जागा शिंदे पुत्र डाॅ.श्रीकांत राखतील असा अंदाज असून भिवंडी लोकसभेत झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आघाडीवर असल्याचा अंदाज आहे. कुणबी मतदारांच्या ध्रुवीकरणाच्या चर्चेमुळेभिवंडीची जागा पाटील यांच्यासाठी अवघड मानली जात आहे.