Pune Land Scam: 'गैरसमजुतीने FIR मध्ये नोंद', बोपडी प्रकरणात Pune Police चा यू-टर्न

Continues below advertisement
पुणे जमीन घोटाळ्यातील (Pune Land Scam) मुख्य आरोपी शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) आणि दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांच्याबाबत पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी माहिती दिली आहे. 'गैरसमजुतीने त्यांची नावे बोपडी (Bopodi) येथील जमिनीच्या गुन्ह्यामध्ये नोंदवली गेली,' असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुंढवा (Mundhwa) येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरूच राहणार आहे. सुरुवातीला शीतल तेजवानी देश सोडून फरार झाल्याची चर्चा होती, परंतु ती देशातच असून तिने अमेडिया एंटरप्रायझेस कंपनीमार्फत वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एकूण नऊ आरोपी असून, बावधन पोलीस ठाण्यात (Bavdhan Police Station) गुन्हा दाखल आहे. आता आरोपी अटकपूर्व जामीन मिळवतात की पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola