Sharad Pawar PC : आमच्या पक्षात सामूहिक निर्णय घेतले जातात - पवार
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत VVPAT वापरावरून सुरू असलेला वाद, पुण्यातील हायप्रोफाईल जमीन घोटाळा (Pune Land Scam) आणि बिहार निवडणुकीतील (Bihar Elections) बदलाचे वारे यावर सविस्तर चर्चा. 'माझं मत वाया गेलं, ही शंका कधी येऊ नये की मी दिलेलं मत योग्य ठिकाणी गेलं नाही,' असं स्पष्ट मत व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर देण्यात आला. काँग्रेसने VVPAT साठी नागपूर खंडपीठात (Nagpur High Court) याचिका दाखल केली असून, न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीसही बजावली आहे. दुसरीकडे, पुणे जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीचे नाव समोर आले आहे. यातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) परदेशात फरार झाल्याचे वृत्त आहे, तर १% भागीदार असलेल्या दिग्विजय पाटीलवर (Digvijay Patil) गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय बिहार विधानसभा निवडणुकीत जनतेला बदल हवा असल्याचं चित्र दिसत असल्याचं विश्लेषणही करण्यात आलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement