CSMT Protest: मोटरमन लॉबीत आंदोलनास बंदी, रेल्वे कर्मचारी संघटनांच्या आंदोलनानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

Continues below advertisement
सीएसएमटी (CSMT) स्थानकात आता मोटरमनच्या लॉबीसमोर आंदोलन करता येणार नाही, मध्य रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुरुवारी रेल्वे कर्मचारी संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. या पार्श्वभूमीवर, 'सीएसएमटी स्थानकातील काँकोर्स परिसरात, जो मोटरमन लॉबीसमोर आहे, भविष्यात कोणत्याही आंदोलनास परवानगी नसेल,' असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. टर्मिनसवर रेल्वे थांबल्यानंतर मोटरमन आणि गार्ड ज्या ठिकाणाहून चार्ज घेतात आणि जिथून प्रवासी फलाटांकडे जातात, त्या मोकळ्या जागेला मोटरमन लॉबी किंवा काँकोर्स म्हणतात. ऐन गर्दीच्या वेळी येथे आंदोलन झाल्याने रेल्वे सेवेवर थेट परिणाम होतो, म्हणूनच प्रवासी आणि रेल्वे क्रूच्या हालचालीत अडथळा येऊ नये यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola