Pune Land Scam: 'अजित पवारांवर कारवाई करा', काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंचं थेट PM मोदींना पत्र

Continues below advertisement
पुण्यातील कथित जमीन घोटाळा (Pune Land Scam) प्रकरणी राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे (Congress MP Chandrakant Handore) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असल्याशिवाय हा व्यवहार होणे शक्य नाही, असा गंभीर आरोप हंडोरे यांनी केला आहे. पत्रात त्यांनी दलित आणि आदिवासींना त्यांच्या जमिनी परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित आहे. १८०० कोटी रुपयांची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आणि त्यासाठी नाममात्र मुद्रांक शुल्क भरल्याचा आरोप आहे. अजित पवार यांनी हा व्यवहार आता रद्द करण्यात आल्याचे म्हटले असले तरी, विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola