Ravindra Dhangekar : Murlihdar Mohol यांच्यावर ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल, धंगेकरांचा दावा
Continues below advertisement
पुण्यातील जॉइंट बोडिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली दोन प्रकरणं घेऊन लवकरच भेटूया', असा थेट इशारा धंगेकर यांनी एक्स (X) वरील पोस्टमधून दिला आहे. मोहोळ यांनी आपल्यावर एकही गुन्हा नसल्याचे म्हटले होते, परंतु धंगेकर यांनी मोहोळ यांचे निवडणुकीतील प्रतिज्ञापत्र पोस्ट करत त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याचा दावा केला आहे. केवळ बदनामीसाठी माझ्यावर तेरा केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही, असे म्हणणे म्हणजे पत्रकार आणि पुणेकरांची फसवणूक आहे, असेही धंगेकर म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement