Pune Land Case: ५.८९ कोटींच्या फसवणुकीत पार्थ पवारांचे पार्टनर अडचणीत, पण पवारांवर गुन्हा का नाही?
Continues below advertisement
पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे व्यावसायिक भागीदार दिग्विजय पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 'जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसरा भागीदार असलेल्या पार्थ यांच्यावर गुन्हा का नाही?' असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी (Amadea Enterprises LLP) या कंपनीने केलेल्या या खरेदीत ५ कोटी ८९ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिग्विजय पाटील, जागेची पॉवर ऑफ अटर्नीधारक शीतल तेजवानी आणि निलंबित सह-निबंधक रवींद्र तारू यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या कंपनीत दिग्विजय पाटील यांची केवळ १% भागीदारी आहे, त्याच कंपनीत पार्थ पवार यांची ९९% भागीदारी असतानाही त्यांच्या नावाचा FIR मध्ये समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement