Pune Land Scam: 'जितका मोठा घोटाळा, तितकाच मोठा FIR स्कॅम', Anjali Dhavaniya यांचा आरोप
Continues below advertisement
पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली धवनिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'जितका मोठा घोटाळा या लोकांनी केला आहे, तितकाच मोठा हा एफआयआर स्कॅम आहे,' असं रोखठोक मत अंजली धवनिया यांनी व्यक्त केले आहे. सुमारे १८०० कोटी रुपयांची जमीन अवघ्या ३०० कोटींना विकत घेण्यात आली आणि त्यावर लागणारे कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले, असा आरोप आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेस (Amedia Enterprises) कंपनीचे नाव एफआयआरमध्ये नाही, मात्र १ टक्का भागीदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याकडे धवनिया यांनी लक्ष वेधले. या संपूर्ण प्रकरणाची EOW आणि ED मार्फत चौकशी व्हावी, हा जमीन व्यवहार रद्द करावा आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी धवनिया यांनी केली आहे. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement